डॉ. किशोर महाबळ - लेख सूची

हिंसेचे ‘डावे’ ‘उजवे’ पुजारी

स्वातंत्र्य प्राप्त करताना येथील राजकीय पक्ष व गटांनी विविध मार्ग चोखाळले. अहिंसक आंदोलनाद्वारे फार मोठ्या लोकसमुदायाने परकीयांविरुद्ध संघर्ष केला. साध्य-साधनशुचितेचा आग्रह धरत कोणतेही आंदोलन व कृती ही हिंसक होऊ नये कारण ती अंतिमतः अनैतिक असते असा या चळवळीचा आग्रह होता. कोणतेही आंदोलन कोणत्याही वेळेस भावनातिरेकामुळे निरपराध्यांच्या हत्येस कारणीभूत ठरू शकते हे लक्षात गेऊन, कोणताही संघर्ष …

पाकिस्तानात लोकशाहीचा आशाकिरण

धर्माधिष्ठित राज्याची स्थापना करू पाहणारे, पारंपरिक लोकशाही चाहणारे व आधुनिक पाकिस्तान निर्माण करू पाहणारे राजकीय नेते यांच्यातील संघर्ष हे गेल्या पाच दशकांतील पाकिस्तानातील राजकारणाचे प्रधानवैशिष्ट्य राहिले आहे. धर्माच्या आधारे देशाची निर्मिती केल्यावर धर्माच्या आधारे देश चालविणे योग्य नसते किंवा चालविता येणे शक्यही नसते हे तेथील सत्ताधाऱ्यांना ठाऊक होते. अगदी पाकिस्तानचे राष्ट्रनिर्माते जीनाही एक आधुनिक पाकिस्तान …

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे कवित्व

भारताच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांची निवड होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्व स्तरांतील निवडणुकींमध्ये जे होते ते म्हणजे व्यक्तिगत आरोप, प्रत्यारोप, उमेदवारांच्या आयुष्यातील घटना व सत्तेच्या किंवा संपत्तीच्या दुरुपयोगासंबंधी टीकाटिप्पणी, उमेदवाराच्या निवडीबाबत ऐनवेळेस केलेली घाई व शेवटी निवडणुका हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या स्तरावर पहिल्यांदाच बघायला मिळाले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे स्वरूप कसे असावे याची चर्चा म्हणूनच …

इकोटोपिया पर्यावरणीय जीवनशैलीचे कल्पनाचित्र

कादंबरी हा साहित्यप्रकार किती सर्जनशीलपणे हाताळता येऊ शकतो याचा अद्भुत प्रत्यय अर्नेस्ट कॅलनबाख यांची इकोटोपिया ही कादंबरी वाचताना येतो. मानवी संबंधातील गुंतागुंत, ताणतणाव, सर्जनशील पैलू, विश्वाचे आकलन, मनुष्य आणि विश्व यांच्यातील सहसंबंध हे असे कादंबरीचे विविधांगी विषय असतात हे आपण नेहमीच अनुभवतो. लेखकाची कल्पनारम्यता, चिंतनशीलता, भाषेच्या माध्यमातून एखाद्या कथेच्या अनुषंगाने कादंबरीत व्यक्त होते. याशिवाय ही …

‘मेरा घर बेहरामपाडा’

जमातवादाविषयीची प्रभावी चित्रफीत: नव्वदीच्या दशकात जातीय दंगलींमुळे प्रचंड मनुष्य हानी व वित्तहानी झाल्याचे आपण अनुभवले. बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करण्यातून जमातवादाला उधाण आले. विविध धर्मसमूहांतील टोकाची धर्मांधताही या दशकात प्रकर्षाने जाणवली. राजकीय नेत्यांनी व त्यांच्या पक्षांनी राजकारणासाठी व सत्तेवर येण्यासाठी धर्मश्रद्धांचा पुरेपूर वापर केल्याचेही अनुभवास आले. आक्रस्ताळी व प्रक्षोभक भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी …

राज्यघटनेचा फेरआढावा कशासाठी?

भारताला भारतीय राज्यघटना हवी, अशी गेली ५० वर्षे मागणी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाने व आताच्या भारतीय जनता पक्षाने संधी मिळताच संविधानाची समीक्षा करण्यासाठी आयोग नेमला. सत्तारूढ पक्षाला संविधानाची समीक्षा का करावीशी वाटते; कोणत्या सुधारणा/दुरुस्त्या संविधानात कराव्यात असे वाटते; संपूर्ण संविधानाचीच समीक्षा करण्याची आवश्यकता काय यावद्दल कोणतीही सैद्धान्तिक मांडणी करण्यात आलेली नाही. वारंवार निवडणुका घ्याव्या लागू …

ताज्या निवडणुकांचा संदेश

दोन वर्षांच्या काळातच पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या व दुसर्‍यांदा त्रिशंकू संसद अस्तित्वात आली. कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. अनेक प्रादेशिक पक्षांचे उमेदवार निवडून आले. त्यातून निर्माण झालेली परिस्थिती अशी आहे की या प्रादेशिक पक्षांची मदत घेतल्याशिवाय कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाला सत्तेवर येणे कठीण झाले आहे. राष्ट्रीय पक्षाचे सरकार किती दिवस टिकवायचे हे …

सामाजिक शास्त्रांच्या अध्यापनातील परंपरानिष्ठता

सांप्रत कला शाखेतील एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे असा अनुभव येऊ लागला आहे. कलाशाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे याचे मुख्य कारण कला शाखेची आवड हे नसून या विषयांत बी. ए., एम्. ए. केल्यावर बी. एड्., एम्. एड्. केले तर शाळेत शिक्षकाची नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे हे होय. कला शाखेत संशोधन करण्याची आवड, …

दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष …